ताज्या बातम्यारणधुमाळी

“अजितदादांनी फक्त शिंदे, ठाकरे…”, शहाजीबापूंचा खोचक टोला

मुंबई | Shahajibapu Patil On Ajit Pawar – शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादांनी आता फक्त शिंदे, ठाकरे, इंदोरीकर महाराजांची भाषणे ऐकावीत असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. अजित पवार यांना आता का काहीच काम उरलं नाही. ते विरोधी पक्षनेते झालेत पण ते कायम सत्तेत राहत असल्यानं नेमकं काय करायचं हेच त्यांना कळत नसल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी कितीही राज्याचे दौरे केले तरी पुढचे 15 वर्षे शिंदे-फडणवीस यांचेच सरकार राहणार असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. एस काँग्रेसपासून राष्ट्रावादीपर्यंत राजकारणात आहेत तरी कधी 50 आमदारांच्या पुढे आकडा का गेला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे शहाजीबापू पाटील म्हणाले, दसरा मेळाव्याला पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणाऱ्यांनी BKC मैदानावर यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळणार असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांना आता भाषणे ऐकण्याशिवाय काही काम राहिलं नाही. दादा कायम खुर्चीवर होते. ते आता विरोधी पक्षनेते झालेत, त्यांना कसं काम करावं कळेनासं झालंय. त्यांच्या मनातले पवार साहेबांना देखील कळत नाही. त्यामुळं दादा कधी झटका देतील हे सांगता येत नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये