ताज्या बातम्यारणधुमाळी

तुरूंगातून बाहेर पडताच राऊतांनी केलं फडणवीसांचं कौतुक; म्हणाले…

मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तब्बल 103 दिवसांनंतर सुटका झाली. तरूंगातून बाहेर आल्यानंतर आज (10 नोव्हेंबर) त्यांनी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) कौतुक केलं आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून सरकार तेच चालवत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनं काही निर्णय चांगले घेतले असून विरोधाला विरोध करणार नाही नाही असं संजय राऊत म्हणाले. तीन महिन्यानंतर तुरूंगातून सुटका झाल्यानंतर लोकांनी स्वागत केलं, प्रेम व्यक्त केलं. लोक मला विसरली असतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी लोकांचे आभार मानले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “जेलमध्ये असताना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि म्हाडाला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. तसंच सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात”, असंही राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. पवारांसोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांचीही भेट घेणार असून येत्या काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये