ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मानले अक्षय कुमारचे आभार; म्हणाले, “तुझे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद…”

मुंबई | Nitin Gadkari Thanked Akshay Kumar – बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय देखील असतो. तसंच अक्षय कुमार काही ना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असतो. आता देखील तो चर्चेत आला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे आभार मानले आहेत.

अक्षय कुमार प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम चित्रपट घेऊन आला आहेच, पण त्यासोबत समाजिक कार्यातही तो मागे नाही. काही महत्वाच्या विषयांवर लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचं काम तो करत असतो. विविध समाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या जाहिरातींमध्ये तो झळकत असतो. नुकतंच रस्ता सुरक्षेच्या एका जाहिरातीत त्यानं काम केलं असून नागरिकांना प्रवास करताना घ्याव्या लागणाऱ्या सुरक्षेची त्याने माहिती दिली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षयचे आभार मानले आहेत.

नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अक्षय कुमार, देशव्यापी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल तुझे आभार. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचे तुझे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. आम्ही जागरूकता आणि लोकसहभागाने भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत”.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये