ताज्या बातम्यारणधुमाळी

“धमक्या देऊ नका, आमचा जन्म शिवसेनेत झालाय…”, शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांचा गुलाबराव पाटलांना इशारा

जळगाव | Sanjay Sawant On Gulabrao Patil – शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. धमक्या देऊ नका…आमचा जन्म शिवसेनेत झाला आहे. धमक्या द्याल तर त्याच पद्धतीनं उत्तर देणार, असा आक्रमक इशारा संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे. ते जळगावमधील शिवसेना मेळाव्यात बोलत होते.

शिंदे गटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना धमक्या दिल्या जात आहेत. तसंच नगराध्यक्षांविरोधात पोलिसांना हाताशी धरून गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला जात आहे, यावरून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाला आक्रमक इशारा दिला आहे.

यावेळी संजय सावंत म्हणाले, “धमक्या देऊ नका, आमचा जन्म हा शिवसेनेतच झाला आहे. त्यांना वाटतंय या विद्या त्यांच्याकडेच आहेत. मात्र या विद्या आमच्याकडे पाचवीला पुजल्या आहेत. त्यामुळे धमक्यांसारखे प्रकार करू नका, जर केले तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशारा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाव न घेता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर माझं पालकत्व म्हणून जबाबदारी आहे, त्यामुळे मुंबईला का असेना लवकरात लवकर त्याच्यासाठी धावून येईल.” जळगावात आज शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये