ताज्या बातम्यारणधुमाळी

राऊतांनी जाहीर केलेल्या यादीतील संजय शिंदे भडकले, म्हणाले…

मुंबई | Sanjay Shinde On Sanjay Raut – राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election 2022) संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली होती. यामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह सहा आमदारांचा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजयमामा शिंदे यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी घोडेबाजारात आहे का नाही हे सरकार स्थापन होत असताना उद्धव साहेबांना माहित आहे. मंत्रिपद सुद्धा मी नाकारलं होतं. आधी उद्धव साहेबांना विचारुन घ्या आणि मग आरोप करा, असं उत्तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी राऊत यांना दिलं आहे.

“माझ्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप धांदात चुकीचे आहेत. मी घोडेबाजारातील आहे की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी मला उद्धव ठाकरेंनी घरी बोलावून काय काय ऑफर दिल्या होत्या, मी काय काय स्वीकारल्या हे विचारून घ्या आणि मग आरोप करा”, असं उत्तर संजयमामा शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं. त्यांनी जो कागद दिला त्या पद्धतीने मतदान केलं. जर घोडेबाजार झाला असेल तर त्यांनी कालच सांगितलं असतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं. आघाडी सरकार स्थापन होता मला विमानाने नेलं, मंत्रिपदाची ऑफर दिली ते मी अजून कुठे एक्सपोज केलं नसल्याचंही आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये