शिंदे गटातील शिरसाटांची ठाकरेंवर जहरी टीका, म्हणाले, “राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना दत्तक…”

औरंगाबाद : (Sanjay Sirsat On Uddhav Thackeray) शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतलं आहे”, असं शिरसाट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आणखीन उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी केलेल्या आरोपालाही प्रतिउत्तर देताना त्यांनी हा. तसेच खोक्यांच्या घोषणेला आता जनता कंटाळली आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवसेनात दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात गोंधळ सुरू ठाकरे गटाचे आमदार सुद्धा शांत होते. मात्र, याविरोधात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. म्हणजे, राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे ते भांडत होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे, अशी जळजळीत टिप्पणी शिरसाट यांनी केली आहे.
पुढे बोलताना सिरसाट म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते सभागृहात येऊन ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. मात्र, आता जनताही या घोषणांना कंटाळली आहे. सत्तेत असताना स्वत:चे पाप लपवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.