Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

मविआला मोठा धक्का; देशमुख आणि मलिकांच्या मतदानावर SC ने दिला निर्णय

नवी दिल्ली – Rajyasabha Election | राज्यसभेचं मतदान एकाच दिवसावर आलेलं असताना राज्यभर सर्वच पक्षांत रणधुमाळीला वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांची अपक्ष आमदारांपुढं लुडबुड चाललेली दिसत आहे. अशातच भाजपने आपला सहावा उमेद्वार उभा केला आहे. त्यामुळं, राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.

दरम्यान, तुरुंगात असेलेल नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राज्यसभेसाठी मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी सरकार अतोनात कष्ट करत आहे. मलिक आणि देशमुख यांनी मतदानाची परवानगी मिळावी यासाठी आगोदर उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तिथे परवानगी न मिळाल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयातही देशमुख आणि परब यांना निराशाच हाती लागलेली दिसत आहे. मात्र, अजून दोन तास कोर्ट सुरु असल्याने परत एकदा याचिका दाखल केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोर्टाने त्या याचीकेवारही आपली भूमिका ठाम दर्शवली तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारला याचा मोठा फटका बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये