ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवार यांचा ‘हा’ पावर गेम? शिंदेच्या आमदारानं थेट अर्थच सांगितला! अजित पवार यांना ही डिवचलं

छत्रपती संभाजीनगर : (Sanjay Shirsath On Ajit Pawar) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं घोषणा केली अन् राज्यासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आमि कार्यकत्यांनी राजीनामा मान्य नसल्याची भूमिका घेत शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहावे अशी सर्वत्र मागणी होत आहे. त्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समिती नेमली होती पक्षाचा पुढील निर्णय या समितीने घ्यावेत असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आज पक्षाच्या निवड समितीने देखील शरद पवार यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामी फेटाळला आहे. आणि शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष पदी राहावे असा समिनीने ठराव केला. या संपूर्ण घडामोडीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांना डिवचलं आहे.

माध्यमाशी बोलताना शिरसाठ म्हणाले, शरद पवार हा पाॅवर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे त्यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझी ताकत म्हणजे माझे ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शातं होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे. अजित पवार जेव्हा बोलत होते, तेव्हा शरद पवार यांनी त्यांना थांबवले नाही. शरद पवार यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत पण शरद पवार यांचा काँग्रेस आणि शिवसेनेवर परिणाम होणार आहे, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला सेट बॅक बसला आहे. यामुळे आता शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगेल.

वज्रमुठ सभा रद्द होण्याला शरद पवार हे प्रकरण कारणीभूत आहे. महाविकास आघाडीच्या सभेला मोठे नेते येणार नाहीत. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची यावरून सभा रद्द झाल्याचा टोलाही आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. याशिवाय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांनाही डिवचलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये