ताज्या बातम्यामनोरंजन

“बिग बाॅसच्या घरात टीना आणि मी…”, शालिन भानोतचा मोठा खुलासा

मुंबई | Shalin Bhanot – काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाचं बिग बॉसचं (Bigg Boss) हे पर्व चांगलंच चर्चेत राहिलं. तसंच या पर्वातील स्पर्धकांनीही त्यांच्या अप्रतिम खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये शालिन भानोत (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Dutta) त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले होते. बिग बाॅसच्या घरात शालिन आणि टीनामध्ये जवळीक वाढली होती. मात्र नंतर त्यांच्यात खटके उडालेले पाहायला मिळाले. यानंतर आता टीनाबरोबरच्या रिलेशनशिपवर शालिननं मोठा खुलासा केला आहे.

नुकतीच शालिननं ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी शालिन म्हणाला, “बिग बॉसच्या घरात टीना आणि मी एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करत होतो. ‘बिग बॉस’च्या घरातील आमचं नात खरं होतं. त्यावेळी आमच्यात जे काही झालं ते नैसर्गिक आणि सहजपणाने झालेलं होतं. त्यामुळे टीनाबरोबरच्या नात्याला मला कोणताही टॅग द्यायचा नाही. तिनं ‘बिग बॉस’च्या घरात असताना माझी खूप काळजी घेतली आहे.”

“मी बिग बॉसच्या घरात ज्या सदस्यांबरोबर मैत्री केली, त्या प्रत्येक नात्यामुळे मलाच बदनाम केलं गेलं. त्यामुळे मी नंतर कोणाशीही मैत्री न करण्याचा निर्णय घेतला”, असंही शालिन म्हणाला.

पुढे ‘बिग बॉस’च्या घरात टीनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यानं शोमध्ये टिकून राहण्यास फायदा होईल, असं वाटलेलं का?, असं शालिनला विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मी बिग बॉसमध्ये राहण्यासाठी टीनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आलो नव्हतो. जर तसं असतं, तर मी शोमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली नसती. बिग बॉसचं घर हा शो खूप छान आहे. पण घरातील सदस्यांमुळे घरात तसं वातावरण निर्माण होतं”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये