Breaking News: शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार, निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; म्हणाले…

मुंबई | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता ते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत दिली.
यावेळी शरद पवार म्हणाले, कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो होतो. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. तसंच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं असलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद मी घेणार नाही. आता पक्षात उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आज (5 मे) सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीनं फेटाळला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. एक राजीनामा नामंजूर करण्याचा, तर दुसरा शरद पवार पुन्हा अध्यक्ष होण्याचा. त्यानंतर निवड समितीनं एकमताने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला होता.