ताज्या बातम्यामनोरंजन

‘तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस का?’; करण जोहरच्या उत्तराने नेटकरी थक्क

मुंबई | फिल्ममेकर करण जोहरला (Karan Johar) कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतो. करण त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत असतो. अशातच करण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. करण जोहरनं थ्रेड्स (Threads app) हे नवीन अॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. या अॅपच्या आस्क मी अनिथिंग या सेशनमध्ये करणला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. चाहत्यांच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

थ्रेड्स या अॅपवर एका चाहत्यानं करणला प्रश्न विचारला, ‘तुला वाटलेली सर्वात मोठी खंत कोणती?’ चाहत्याच्या या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, ‘मला माझ्या आवडत्या अभिनेत्री श्रीदेवी मॅडमसोबत काम करायला मिळालं नाही’

थ्रेड्स या अॅपवर एका नेटकऱ्यानं करणला प्रश्न विचारला, ‘तू गे आहेस का?’ नेटकऱ्याच्या या प्रश्नाला करणनं उत्तर दिलं, ‘तू इंटरेस्टेड आहेस का?’ करणच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये