जेएनयू संघटनांचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप…

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थांना कडक इशारा दिला आहे. कॅम्पसमध्ये हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. इथली शांतता आणि सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांपासून दूर राहा असं जेएनयू प्रशासनानं विद्यार्थ्यांना म्हटलं आहे. कुलगुरू, रेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर वसतिगृहाला भेट दिली, अशी माहिती रजिस्ट्रार रविकेश यांनी दिली. आता यामुळे विद्यापीठ संघटनांना चांगलाच वचक बसणार आहे.
झालेल्या हिंसाचारानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने दावा खळबळजनक दावा केला आहे. रविवारी संध्याकाळी संभाव्य हिंसाचाराची पोलिसांना सूचना देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्यावेळी हिंसाचार झाला तेव्हाही आम्हाला पोलिसांसमोर धमक्या देण्यात आल्या. परंतू त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं विद्यार्थी संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे आता पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
जेएनयूएसयू आणि इतर संघटनांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. AISA कार्यकर्त्यांनी पोलिस मुख्यालयाजवळ आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. मात्र, जेएनयू मध्ये हिंसाचाराचे प्रकार वारंवार का घडत आहेत आणि विद्यापीठ प्रशासन याची वेळीच दखल का घेत नाही.