शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका, नाव दिले मात्र, तिन्ही चिन्ह फेटाळले!

नवी दिल्ली : (Shinde group’s election Symbol rejected Election Commission) निवडणूक आयोगाने ठाकरे- शिंदे गटाला नावे आणि चिन्ह जाहीर केली आहेत. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे. तर ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. परंतु शिंदे गटाला कोणतं ही चिन्ह देण्यात आलं नाही. निवडणूक आयोगाने उद्या शिंदे गटाला पुन्हा नविन तीन चिन्ह देण्यात सांगितले आहेत.
एकनाथ शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पण त्रिशूळ आणि उगवता सूर्य या चिन्हांबाबत आधीच भूमिका स्पष्ट झाली होती. तर तिसरा पर्याय म्हणजे गदा हे चिन्ह धार्मिक प्रतिक असल्यानं ते कुणालाही देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाने आता तीन नवे पर्याय द्यावेत असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.