ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाची पूजा होणार? लवकरच न्यायालयाची सुनावणी

Dnyanvapi Masjid : मागील काही दिवसांपासून देशात अनेक कारणावरून धार्मिक वाद सुरु आहेत. त्यांपैकी ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण चांगलेच पेटलेले दिसत आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये एक सर्वेक्षणामध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान तेथील शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मागण्यात आली होती. संबंधित याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यासाठीची याचिका श्रीकृष्ण मुक्ती स्थळाचे अध्यक्ष राजेश मणी यांनी केली आहे. त्यावर २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. श्रावण महिना सुरु झाला असून या महिन्यात हिंदू लोक प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करतात. त्यामुळे या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, हिंदू पक्षाचे वकिल विष्णू शंकर जैन यांनी म्हटलं आहे की, सदर प्रकरणातील पुरावे आणि १९३७ च्या एका याचिकेतील कोर्टाचा निकाल न्यायालयात सादर केल असून ते मुस्लीम पक्षाकडून केला जात असलेला युक्तिवाद खोटा असल्याचं ते सिध्द करतात.