ताज्या बातम्यामुंबई

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचं ठाणेकरांना मोठं गिफ्ट; अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज कोपरी पुलाचे उद्घाटन

ठाणे | मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह आहे. शिंदेंना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात रात्री कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. ठिकठिकाणी केक कापले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाणेकरांना आज ही खास भेट मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते ठाण्यातील कोपरी पुलाचे आज उद्घाटन होणार आहे. हा ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. अनेक वर्ष ठाणेकर या पूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते.

ठाणे-मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचं काम पूर्ण झाले आहे. आज या पुलाच्या उर्वरित दोन मार्गिका नागरिकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. ठाणेकरांच्या दृष्टीनं हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘एमएमआरडीए’ ने कोपरी पुलाच्या बांधकामास 2018 ला सुरुवात केली होती. हा पूल दोन टप्प्यात आठ पदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दीड वर्षांपूर्वी या पुलाच्या दोन मार्गिका तयार झाल्या. त्यानंतर एमएमआरडीएने मुख्य पुलाचे काम हाती घेतले होते. हा पूल उद्घाटनासाठी सज्ज झाला असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी पुलाचं उद्घाटन होणार आहे.

हा पूल ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या भागात कायमच वर्दळ असते. ठाणेकर गेले अनेक वर्ष या पूलाच्या प्रतिक्षेत होते. आता हा आठ पदरी पूल झाल्यामुळे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना जी वाहतूक कोंडी होत होती ती होणार नाही. वाहतूक सुरळीत सुरू झाल्यानं ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये