श्रेयस तळपदे साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
मुंबई | Shreyas Talpade Will Play The Role Of Atal Bihari Vajpayee – अभिनेता श्रेयस तळपदे हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. सध्या श्रेयस तळपदे हा झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत असून त्याची ही मालिका चांगलीच गाजत आहे. तर दुसरीकडे श्रेयस आगामी काळात अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटात राजकीय भूमिका साकरत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर या चित्रपटात नक्की श्रेयस कोणती भूमिका साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या चित्रपटाच्या पोस्टरमधून श्रेयस तळपदे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचबरोबर त्याने आपल्याला सोशल मीडिया अकाऊंटवर अटलबिहारी वाजपेयी याची एक कविता देखील पोस्ट केली आहे. या चित्रपटातून खरे देशभक्त, सर्वांचे लाडके नेते अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकरण्याचं भाग्य लाभलं असल्याचं देखील त्यानं म्हंटलं आहे.
श्रेयस तळपदेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरसोबत त्यानं अटलजींची एक कविता देखील शेअर केली आहे. श्रेयसनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा। – अटलजी”