देश - विदेश

कंत्राटी भरतीचं टेंडर कोणाकडे? जयंत पाटलांनी दाखवले भाजप आमदाराकडे बोट

मुंबई : (Jayant Patil On BJP) राज्य शासनाच्या कंत्राटी भरती प्रक्रियेला राज्यामधून विरोध होताना दिसून येत आहे. आज जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरुन सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तरुणांच्या भविष्याचा आणि कामकाजाच्या जोखिमेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात तिथे कंत्राटी कर्मचारी नेमणं चुकीचं आहे. हे अतिशय गंभीर असून बेभरोशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन कामं करुन घेतली आणि चुका झाल्या तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. हळूहळू आपण सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवू लागलो आहोत. कंत्राटी कामावर गेलेल्या युवकाचं भविष्य कायम अधांतरी असतं, असं ते म्हणाले आहेत.

कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप आमदारांच्या असल्याच्या चर्चा आहेत, त्याबद्दल जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, हे अतिशय गंभीर असून अशा पद्धतीने जवळच्या लोकांना लाभ करुन देण्यासाठी सरकार काम करत असेल तर चुकीचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये