“नारायणराव त्याच सोनियांच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्षे तुम्ही…”, सुषमा अंधारेंची सडकून टीका

मुंबई | Sushama Andhare On Narayan Rane – काल (5 ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ‘दसरा मेळावा’ (Dasara Melava) पार पडला. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी केलेल्या भाषणात भाजप नेते आणि केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “जे नारायण राणे (Narayan Rane) शिवाजी पार्कवर सोनियांचे विचार ऐकायचं का असं म्हणतात, ते नारायण राणे याच सोनियांच्या पायावर 10 वर्षे लोटांगण घालत होते”, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.
“नारायणराव, आम्हाला तुमच्या दोन वाह्यात बाजार बुणग्यांवर बोलायचंच नाही. पण, नारायण राणे तुम्ही शहाणेसुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी, तुम्ही म्हणावं की शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे आहे का? विसरलात का नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्षे तुम्ही आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्री अशी पदं भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं का आम्हाला”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
रामदास कदमांनी (Ramdas Kadam) दोन ते तीनवेळा राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये जाण्याची धमकी देत शिवसेनेला ब्लॅकमेल केलं. तेव्हा तुम्ही तुमचं हिंदुत्व कुठे गहाण ठेवलं होतं? अरे आम्ही काय बगलेत रेडिओ ठेवतो की धोतरावर इन करतो की आमच्या कानात बिडी आहे. आम्हाला काही कळत नाही की काय, म्हणे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो”, असा टोला देखील सुषमा अंधारेंनी लगावला आहे.