आकांक्षा दुबेनंतर ‘या’ अभिनेत्रीचं निधन, नातेवाईकाच्या घरात आढळली मृतावस्थेत

मुंबई | Ruchismita Guru – प्रसिद्ध भोजपरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या (Akanksha Dubey) आत्महत्येनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आकांक्षाच्या मृत्यूनंतर आता आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्री रूचिस्मिता गुरू (Ruchismita Guru) हीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रूचिस्मिताचा मृतदेह तिच्या नातेवाईकाच्या घरात आढळला आहे.
रूचिस्मिता गुरू ही बालंगीत शहरातील तळपलीपाडा येथे राहत होती. तसंच ती सुदापाडा येथे असलेल्या तिच्या मामाच्या घरी राहायला गेली होती. रूचिस्मिता ही 26 मार्च 2023 रोजी रात्री तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय रूग्णालयात पाठवला आहे.
रूचिस्मिताच्या आईनं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, माझं आणि रुचिस्मिताचं बटाट्याचा पराठा बनवण्यावरून भांडण झालं होतं. मी तिला 8 वाजता पराठा बनवण्यास सांगितला होतं. पण रुचिस्मितानं मला सांगितलं की, मी 10 वाजता पराठा बनवेल. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर काही वेळानं रुचिस्मिता मृतावस्थेत आढळली.
याआधी देखील रुचिस्मितानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातंय. तसंच आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, रुचिस्मितानं अनेक अल्बममध्ये काम केलं आहे. तिनं अनेक स्टेज शोमध्ये परफाॅर्म केले आहेत. अभिनयासोबतच तिला गाण्याचीही आवड होती. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय होती.