दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकपमध्ये १३ वर्षांनी केला भारताचा पराभव
पर्थ : ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला. ज्यामुळे भारताला सामना ५ विकेट्सने गमवावा लागला. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारत केवळ १३३ धावाच करु शकला. ज्या डिफेन्ड करताना भारताने चांगली झुंज दिली, पण अखेर ५ विकेट्सने भारताला सामना गमवावा लागला.
टी 20 वर्ल्डकप ग्रुप २ मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचे ५ विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. खराब सुरूवातीनंतर एडिन माक्ररम (५१) आणि डेव्हिड मिलर (४६ चेंडूत नाबाद ५९ धावा) यांनी डाव सावरत झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचे आव्हान षटकात पार केले आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने २ तर हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत झुंजार ६८ धावा केल्या. या खेळीच्या जोरावरच भारत १३३ धावांपर्यंत पोहचू शकला आहे.
सुरूवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत २० षटकात ९ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत ४० चेंडूत ६८ धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने १५ तर विराटने १२ धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ४ तर वेन पार्नेलने ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान , डेव्हिड मिलरने ४६ चेंडूत नाबाद ५९ धावा करत आफ्रिकेचा शेवटच्या षटकात चौकार मारत विजय निश्चित केला.
मार्करम-मिलर जोडीची विजयी खेळी
दक्षिण आफ्रिका पोहचवली टॉपवर
भारताच्या पराभवाने पाकची झाली अडचण
सूर्यकुमार यादवचे 40 चेंडूत झुंजार 68 धावा
कॅच सोडनेही पडले महागात
सूर्यकुमार दिनेश कार्तिक अर्धशतकी भागीदारी