मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीनं फेटाळला

मुंबई | Sharad Pawar – नुकतीच राज्याच्या राजकारणातील मोठा बातमी समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीनं फेटाळला आहे. आज (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला.
आज राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीनं शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव मांडला. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी पुन्हा अध्यक्ष व्हावं, असा प्रस्ताव मांडला.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. एक राजीनामा नामंजूर करण्याचा, तर दुसरा शरद पवार पुन्हा अध्यक्ष होण्याचा. त्यानंतर निवड समितीनं एकमताने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.