क्रीडादेश - विदेश
दिनेश कार्तिकच्या धडाकेबाजीनं; RCB च्या धावांचा डोंगर

मुंबई : आयपीएल च्या १५ व्या हंगामातील ५४ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी करत ८ चेंडूत ३० धावा केल्या. यामुळं आरसीबी संघाला १९२ धावांपर्यंत डोंगर उभा करता आला. कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने ५० चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या.
दरम्यान, या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली सुरवातीलाच शुन्य धावावर बाद झाला. मात्र, इतर फलंदाजांनी याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. पॉवरप्लेमध्ये आरसीबीनं एका विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या आहेत. पाटीदारने ३८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्यानंतर सुचिथच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला.