ताज्या बातम्यामनोरंजन

किंग खानच्या ‘जवान’ची विक्रमी कमाई; ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार?

मुंबई | Jawan Box Office Collection – सध्या बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. ‘जवान’ चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर आता हा चित्रपट ‘पठाण’चा (Pathaan) विक्रम मोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता ‘जवान’नं विक्रमी कमाई केली असून आता तो ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान चित्रपटानं पहिल्याच दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. काल या चित्रपटानं देशभरात 386 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं 660 कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे आता जवान चित्रपट 700 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शाहरूखच्या पठाण चित्रपटानं देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटानं जगभरात तब्बल 1000 कोटी कमावले होते. तर आता जवान चित्रपट विक्रमी कमाई करत आहे. त्यामुळे तो पठाणचा रेकॉर्ड मोडणार असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये