ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पालिका निवडणुकीत मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा; शिंदे गटाला धक्का!

मुंबई : (Sandeep Deshpande On Eknath Shinde) मागील काही दिवसांत भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घेतल्या गेलेल्या भेटीगाठीमुळे मनसे-भाजप आगामी पालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे गट-मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला जोराचा धक्का बसला आहे.

दरम्यान, आता पालिका निवडणुकीत मनसेनं ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज त्यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. त्यामुळे आता सर्व चर्चेला पुर्णविराम मिळाला असून शिंदे गटासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे. मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांचे युतीसाठी माध्यमांना सुचक वक्तव्य येत असताना मनसेचा हा एक ला चलो रे च्या नाऱ्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी ठरणार आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मुंबईत सर्व २२७ जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार असून आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. युती हा जर तरचा विषय आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमधे चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे” संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये