ताज्या बातम्यादेश - विदेश

ऐकावं ते नवलचं! सार्वजनिक स्विमींगपूलमध्ये महिलांना टॉपलेस पोहण्यास ‘या’ ठिकाणी परवानगी

सर्वसाधारणपणे स्विमिंग पूलमध्ये स्त्री-पुरुष यांना एकत्र आंघोळ करण्याची परवानगी असली तरी कपड्यांशिवाय कोणालाही आंघोळ करण्याची परवानगी नाही, पण जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आता असंच काहीसं पाहायला मिळलं, कारण येथे महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची परवानगी देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, बर्लिनमधील महिलांना शहरातील सार्वजनिक जलतरण तलावांमध्ये टॉपलेस जाण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने गुरुवारी केली. स्विमिंग पूलमध्ये महिला आणि पुरुषयांच्यात भेदभाव झाल्याची तक्रार एका महिलेने केली होती, त्यानंतर बर्लिन सरकारने हा अत्यंत विचित्र निर्णय घेतला होता.

बर्लिन सिनेट फॉर जस्टिस, डायव्हर्सिटी अँड अँटी डिस्क्रिमिनेशनने म्हटले की, महिलेने सिनेटच्या लोकपाल कार्यालयात समान वागणुकीची मागणी करत महिलांना पुरुषांप्रमाणे टॉपलेस पोहण्याची परवानगी दिली पाहिजे, असं म्हटलं. त्यानंतर शहरातील सार्वजनिक पूल चालविणारे बर्लिनर बॅडरबाटिबे यांनी कपड्यांच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिनेटने म्हटले आहे.

लोकपालचे प्रमुख डॉरिस लेब्शर म्हणाले, “लोकपाल कार्यालय बॅडरबाटिबे यांच्या निर्णयाचे स्वागत करते, कारण यामुळे सर्व बर्लिनवासीयांना समान अधिकार आहेत, मग ते पुरुष असोत किंवा महिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये