उर्फीनं विमानतळावर केलं संतापजनक कृत्य, पाहा व्हिडीओ

मुंबई | Urfi Javed – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर चित्रा वाघ व उर्फी यांच्यातील वाद रंगत गेला. तसंच उर्फीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना उत्तर देण्यास सुरुवात केली. तसंच माझा नंगानाच सुरू राहणार असंही उर्फीनं म्हटलं आहे. या दरम्यान, तिनं विमानतळावर एक संतापजनक कृत्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
उर्फी विमानतळावर जाताच तिच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीनं तिचा व्हिडीओ काढला. त्यावेळी उर्फी कॅमेऱ्यासमोरच तिच्या शरीराचा एक भाग दाखवतााना दिसत आहे. तसंच हे कृत्य करताना ती हसतानाही दिसते. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. तसंच उर्फी ट्रोलिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसते. मात्र, तिचा हा नवा व्हिडीओ पाहून पुन्हा नवीन वादात भर पडल्याचं दिसतंय.