इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; मध्यरात्री दरड कोसळली, 5 जणांचा मृत्यू,100 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

रायगड | Irshalwadi Landslide – रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडी (Irshalwadi) येथे दरड कोसळल्याची भंयकर दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये शंभरहून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी मध्यारात्री दरड कोसळ्याचे बोलले जात आहे. या दुर्घेटनेत जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्यत वाईट परिस्थिती या गावावर आल्याचे दिसत आहे. 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी हायवेपासून आतील रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला आहे. रेस्क्यूसाठी पनवेल महापालिकेचे कर्मचारीही दाखल झाले आहेत.
इरसालवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, दादा भुसे तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपतकालीन नियंत्रण कक्षात दाखल झाले आहेत. तेथून ते आढावा घेत आहेत. ग्रामस्थांना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.