ताज्या बातम्यारणधुमाळी

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीचं पथक घरी दाखल

मुंबई | ED’s Raid On Sanjay Raut’s House – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथकं आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं आहे. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीच्या एकूण तीन पथकांकडून कारवाई होत आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती. तसंच राऊतांच्या कार्यालयावर झालेल्या या कारवाईविरोधात आता शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. राऊतांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत आहे, असा आरोप शिवसैनिक करत आहेत.

दरम्यान, मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये