ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“खोक्यांचे व्यवहार करतानाचे उद्धव ठाकरेंचे कॅसेट…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

नाशिक : (Narayan Rane On Uddhav Thackeray) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे हे खोक्यांचे व्यवहार करत असतानाचे अनेक कॅसेट आपल्याकडे आहेत, असा दावा राणेंनी केला. या सर्व क्लिप्सचा वापर आपण योग्यवेळी करू, असंही ते म्हणाले आहेत.

‘शिवसेना सोडलेले सगळे नेते संपतील पण शिवसेना संपणार नाही’ उद्धव ठाकरे यांच्या या दाव्याबाबत विचारलं असता राणे म्हणाले, “दावा सगळेच करत असतात. पण स्वत: दावा करून काहीही उपयोग नाही. राज्यातील जनतेनं दावा करायला हवा. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांच्याकडे १५ आमदार आहेत, पण ते आमदारही आगामी निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे राहतील की नाही? हे माहीत नाही. त्यांना कुठलंही अस्तित्व राहिलं नाही. त्यांना सोडून गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात? याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं, अशा शब्दांत राणेंनी टीका केली.

राणे पुढे म्हणाले, “माझ्याकडे उद्धव ठाकरेंच्या संभाषणाच्या अनेक कॅसेट आल्या. पण मी त्यातील एकाचाही उपयोग नाही केला. ते शिंदे गटातील आमदारांना खोके-खोके म्हणतात. पण उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे आले आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी केवळ खोके जमवले की काही पवित्र कामही केलं, याचं आत्मपरीक्षण करावं.” सगळ्या क्लिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. पण याचा योग्यवेळी वापर करेन, असंही नारायण राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये