ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

नऊ महिन्यानंतर सत्तासंघर्षाचा युक्तीवाद संपला! आता थेट निर्णय; सुप्रिम कोर्टाने निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : मागील ९ महिन्यांपासून सुरू असलेली राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. आता येत्या काही दिवसांत या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो. या सुनावणीचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे, त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून राज्याचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे युक्तीवाद संपला, आता थेट निर्णय येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या च्या घटनापीठाने शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांमधील मतभेदामुळे उद्भवलेल्या घटनात्मक मुद्द्यांवरच्या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला आहे. येणाऱ्या निर्णयामुळे कोणाला धक्का बसणार अन् कोणाच्या बाजूनं निर्णय येणारे हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये