देश - विदेश

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला भारताच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली : आज भारताच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला असून ते २९ वे लष्करप्रमुख बनले आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर हा पदभार मनोज पांडे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. याआधी पांडे यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून १ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला होता . याचप्रमाणे त्यांनी सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश मधील ‘एलएसी’ सीमेची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती ती त्यांनी पार पाडली .

तसंच पांडे यांनी आपल्या कारकिर्दीत, अंदमान आणि निकोबार कमांड चे कमांडर-इन-चीफ म्हणूनही काम केले आहे. कारगील डिव्हिजन कमांडची जबाबदारी सांभाळताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून पांडे यांना विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे. याचप्रमाणे भारतातील तिन्ही संरक्षण सेवेमध्ये काम करणारे कमांड ही आहेत .

जनरल पांडे यांचे प्राथमिक शिक्षण नागपूर मधील वायुसेनामधील केंद्रीय विद्यालयात झाले. अकरावीनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पुण्याच्या नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीत दाखल झाले. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२मध्ये ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. कॅम्बर्ली कॉलेज, महूचे आर्मी वॉर कॉलेज, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी ‘हायर कमांड कोर्स’ केला आहे. विविध विभागात सेवा बजावली असून १ फेब्रुवारीला त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार देण्यात आला तर आज त्यांनी लष्करप्रमुखाचा पदभार स्वीकारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये