इतरताज्या बातम्यापुणेशिक्षणसिटी अपडेट्स

शिक्षक दिनीच शिक्षकांना मोठा झटका; पुणे विभागातील ‘या’ शिक्षकांचा पगार होणार नाही, जाणून घ्या कारण

पुणे | Teachers Day – आज (5 सप्टेंबर) संपूर्ण देशभरात शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला जात आहे. या शिक्षक दिनीच शिक्षकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे (Pune) विभागातील संस्थाचालकांच्या चुकांमुळे शिक्षकांचा पगार रखडणार आहे. शिक्षकांना शालार्थ आयडीच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांना विनावेतन काम करावं लागणार आहे.

पुणे विभागामधील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी एक शिबीर घेण्यात आलं होतं. या शिबीरामध्ये 167 शिक्षकांचे प्रस्ताव आले होते. पण त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे 161 शिक्षकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. तसंच शालार्थ आयडी निघाल्याशिवाय शिक्षकांचे पगार होत नाहीत, त्यामुळे शिक्षकांना मोठा फटका बसला आहे.

नेमकं कारण काय?

संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांची भरती करताना रितसर परवानगी घेतली नव्हती. तसंच राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी होती, तरीही त्यावेळी भरती झाली. तसंच काही शिक्षकांचे प्रस्ताव अर्धवटच सादर केले गेले, त्यामुळे हे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये