ताज्या बातम्या

‘प्रिय निलू बाळा…’ सुषमा अंधारेंचं ट्विट चर्चेत

मुंबई | शिवसेनेचे फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या नेहमी आपल्या परखड वक्तव्याने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे. निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना बारामतीचा खासदार बदलावा लागेल, अशी टीका केली होती. त्यावर सुषमा अंधारेंनी ट्वीट करत निलेश राणेंना (Nilesh Rane) प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे ट्वीटमध्ये म्हणाल्या की, “प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजपा अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेनाभवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का?”

निलेश राणेंचे ट्वीट काय होते?

निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार असल्याच्या इशाऱ्यावर टीका करत म्हटलं होत की, “या ठिकाणी ६ पैकी २ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील.” यांच्या याच ट्वीटला सुषमा अंधारेंनी उत्तर दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये