ताज्या बातम्यामनोरंजन

चिमुकल्यांसाठी मनोरंजनाचा तडका; प्रेरणादायी असे ‘हे’ चित्रपट तुमच्या मुलांना एकदातरी दाखवाच

सध्या आपल्याला बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये (Bollywood Movie) नावीन्य पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या थीमवर आधारित चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडते. यामध्ये मग कॉमेडी, हॉरर, अॅक्शन, ड्रामा अशा विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. तसंच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना प्रेक्षकांना मनोरंजन द्यावं एवढंच वाटत नाही तर सोबतच काही मोलाचे संदेश द्यावे असंही वाटत असतं. तर काही असे चित्रपट आहेत जे लोकांसोबत लहान मुलांवरही प्रभाव टाकतात. तर आता आपण काही अशा चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत जे लहान मुलांसाठी मनोरंजक आणि फायदेशीर आहेत.

1. चेन कुली की मेनकुली – ‘चेन कुली की मेनकुली’ हा चित्रपट लहान मुलांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात एका अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलाची स्टोरी दाखवण्यात आली आहे, ज्याला क्रिकेटर व्हायचं असतं. तसंच या मुलाला एक बॅट सापडते आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं. हा एक मजेशीर आणि प्रभावदायी असा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्यामुळे तुम्हीही हा चित्रपट तुमच्या मुलांसोबत नक्की पाहा.

image 2 16

2. तारे जमीन पर – आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. हा चित्रपट लहान मुलांसोबतच पालकांसाठीही महत्त्वाचा आहे. या चित्रपटात डिस्लेक्सिया आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाची स्टोरी दाखवण्यात आली आहे. तो अभ्यासात कमकुवत असतो पण तो चांगला चित्रकारही असतो. त्याला त्याचे एक शिक्षक त्याची खरी ताकद ओळखण्यात मदत करतात. ही अतिशन प्रेरणादायी असा चित्रपट असून तो प्रत्येकाने एकदा तरी पाहिलाच पाहिजे.

image 2 17

3. निले बटे सन्नाटा – ‘निले बटे सन्नाटा’ हा चित्रपट आई आणि मुलीच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये गरीब परिस्थिती असल्यामुळे आई आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी घरकाम करत असते. तसंच तिच्या स्वप्नांसाठी आई खूप मेहनत घेत असते. या चित्रपटात स्वरा भास्करनं मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट देखील तुम्ही तुमच्या मुलांसोबत एकदा तरी पाहा.

image 2 18

4. आय अॅम कलाम – ‘आय अॅम कलाम’ हा चित्रपट प्रत्येक लहान मुलानं पाहिलाच पाहीजे. नील माधव पांडा यांचा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आहे. या चित्रपटात एका गरीब मुलाची स्टोरी दाखवण्यात आली आहे ज्याला शाळेत जायचं असतं, इंग्रजी शिकायचं असतं आणि सोबतच मोठा माणूस बनण्याचं त्याचं स्वप्न असतं. हा चित्रपट लहान मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

image 2 19

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये