सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; जागतिक क्रमवारीत ‘या’ स्थानावर

Worlds Best universities Ranking | जगभर प्रतिष्ठित असलेल्या Quacquarelli Symonds (QS) चा 2023 चा निकाल 8 जून ला प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये जगभरातील हजारो विद्यापीठांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रँकिंग दिली जाते. अनेक भारतीय विद्यापीठांचा देखील यात समावेश असतो. यावर्षी त्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठानं (SPPU) मागील वर्षीपेक्षा 50 गुणांनी बाजी मारली आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बेंगळुरूने या यादीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
2023 च्या सर्वेनुसार जागतिक विद्यापीठ क्रमवारीत जगभरातील जवळपास 1,500 विद्यापीठांचा समावेश करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले विद्यापीठ रँकिंगमध्ये मागील वर्षी 591 – 600 मध्ये होते. यावर्षी मात्र पुणे विद्यापीठाने 50 गुणांनी भर पडली आहे. यावर्षीच्या निकालात पुणे विद्यापीठ रँकिंगमध्ये 541-550 मध्ये स्थान मिळवले आहे.
विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा, प्लेसमेंट, प्राध्यापक आणि विद्यार्थी गुणोत्तर, प्रति विद्याशाखा, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर, रोजगार परिणाम आणि आंतरराष्ट्रीय संशोधन यासह अनेक मापदंडांचा विचार करून जगभरातील मोठमोठ्या युनिव्हर्सिटींना रँकिंग दिली जाते. या रँकिंग वरून विद्यापीठांचा दर्जा ठरवला जातो.