देश - विदेशरणधुमाळी

“भीम जयंती, शिवजयंतीच्या डीजेचा मुस्लिमांना त्रास…”

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांबाबत भाषण केलं. आणि मशजिदींवरील भोंग्यांविरोधात राज्य सरकारनं कारवाई नाही केल्यास मनसे चौकाचौकात भोंगे लावून हनुमानचलीसा रेकॉर्ड लाजवेल असा इशाराच दिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर टिकाटिपण्णी केली आणि हा राज्यभर वादचा मुद्दा तयार झाला आहे. यावरून विरोधी पक्षांनी राज्यसरकारला आडवा पाय लावण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर मनसे भाजपची बी टीम असल्याची टीकाही करण्यात येत होती.

मात्र असं असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंची ही भोंगाविरोधी भूमिका संविधानाविरोधात असल्याचं मत व्यक्त केलंय. इतकच नाही तर राज ठाकरेंची दादगिरी सुरु असल्याचं भाष्य करत त्याला उत्तर देण्यासंदर्भातही आठवलेंनी प्रतिक्रिया दिलीय.

आठवले म्हणाले की, “भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त राज ठाकरेंना करता येते असं अजिबात नाही. दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशापद्धतीची भूमिका त्यांनी घेऊ नये. भोंगे काढलेच नाही तर अशाप्रकारचा धमकी वजा इशारा देणं चुकीचं आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लीम धर्मियांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे,” असंही आठवलेंनी म्हटलंय.

“मंदिरांवर ज्यांना भोंगे लावायचे आहेत त्यांनी लावावेत. नवरात्र उत्सव, गणपती उत्सव असतो, भीम जयंती, शिवजयंती असते तेव्हा मोठे डीजे असतात. त्याचा मुस्लिमांना त्रास होतो. मात्र त्यांची याबद्दल काही अजिबात तक्रार नाहीय. त्यामुळे अजानसंदर्भात भोंगे काढण्याची ही भूमिका आहे ती संविधानाच्याविरोधात आहे. ही भूमिका आहे ती समाजात, धर्माधर्मात वाद निर्माण करणारी आहे. राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा,” असं मत आठवलेंनी व्यक्त केलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये