“अमित खूप प्रेम…”, धर्मेंद्र यांची जिवलग मित्रासाठी खास पोस्ट!

मुंबई | Dharmendra Deol – बाॅलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील त्यांचा लूक असलेलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये ‘अमित श्रीवास्तव’ हे पात्र साकारणार आहेत. तसंच राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजात्या यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी एक ट्विट केलं आहे.
धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाद्वारे अमिताभ आणि ‘ऊंचाई’ या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर ‘शोले’ चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी अमिताभ यांना ‘बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता’ अशी उपाधी दिली आहे. तसंच ‘शोले’ चित्रपटामध्ये त्यांच्यावर चित्रीत झालेलं ‘ये दोस्ती..’ हे गाणं फार गाजलं होतं.
धर्मेंद्र यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “अमित खूप प्रेम. तू राजश्री फिल्म प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये काम करत आहेत अशी माहिती मिळाली. मस्त. बाॅलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम निर्मिती संस्था एकत्र काम करत असल्याचा मला आनंद आहे. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” अशी खास पोस्ट धर्मेंद्र यांनी शेअर केली आहे.