इतरताज्या बातम्यादेश - विदेशपुणे

रिक्षात ‘नो रोमान्स’ ची पाटी होतेय व्हायरल

ओयो हॉटेल्समध्ये अविवाहीत जोडप्यांना प्रवेश दिला जाणार नाही. अशी बातमी वाऱ्यासारखी पसरताच एका ऑटोमध्ये लावलेली पाटी सध्या चर्चेत आहे. एका प्रवाशानं रिक्षातील पाटीचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. या पाटीचा फोटो सध्या व्हायरल झाला असून, या पाटीवर ‘नो रोमान्स’ म्हणत रिक्षा चालकानं जणू प्रेमी युगुलांना थेट इशारा दिला आहे. ओयो हॉटेल्सवर अविवाहीत प्रेमी युगुलांना (Cuple) बंदी घातल्यापासून, ओयो या बँडची सोशल मीडियात (Social Media) प्रचंड चर्चा होत आहे. त्यानंतर रिक्षा चालकाने त्याच्या ऑटोमध्ये लावलेली पाटी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पाटीवर ‘नो रोमान्स’ या शब्दाचा उल्लेख करत, प्रवाशांना रोमान्स करण्यास मनाई आहे, असा थेट इशारा रिक्षा चालकानं दिला आहे. ही व्हायरल (Viral) पाटी पाहून आपण देखील रिक्षा चालकाच्या चाणाक्ष बुद्धीचे कौतुक कराल. पाटीच्या वरच्या भागावर वॉर्निंग (Warning) हा शब्द मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहिलेले आहे. नंतर खालच्या बाजूला ‘खबरदार, नो रोमान्स, ही ऑटो आहे, तुमची खासगी जागा किंवा ओयो नाही. कृपया सुरक्षित अंतर ठेवा आणि शांत बसा. आदर द्या आणि आदर मिळवा. धन्यवाद’ असं पाटीवर लिहिण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये