क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजनरणधुमाळी

नाद करा पण इतका! मॅच मुंबई अन् चेन्नईची मात्र चर्चा गौतमीचीच…

मुंबई : (Gautami Patil On Mumbai Indian’s) मागील दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘सबसे कातील गौतमी पाटील’ हे वाक्य धुमाकूळ घालत आहे. कारण ते नाव सध्या अवघ्या महाराष्ट्रभर पसरल आहे. गौतमी पाटील नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या कार्यक्रमामुळे तर कधी तिच्यावर कोणी केलेल्या वक्तव्यामुळे. गौतमीचे अनेक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. तिचे कार्यक्रमही खुप गाजतात.

तिच्या कार्यक्रमात नेहमीच काहीतरी राडा होतो आणि त्याची बातमीही येतेच. तिच्या टिका करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मग ते लावणी कलाकार असो किंवा इंदुरीकर महारांजासारखे प्रसिद्ध महाराज. नुकतच त्यानींही तिच्यावर वक्तव्य केलं आणि त्याची बरिच चर्चा रंगली.

पण आता गौतमीची चर्चा ही वेगळ्या कारणाने रंगली आहे. ती म्हणजे आयपीएलमुळे. देशभरात आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळत आहे.

अशातच हा फिव्हर गौतमी पाटील वरही चढला होता. नुकतच गौतमीनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की आवडता क्रिकेटर कोणता तर तिनं झटक्यात एमएस धोनी हे नाव घेतलं.

मात्र ज्यावेळी मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग असा प्रश्न विचारला तेव्हा गौतमीनं मला मुंबई इंडियन्स आवडते असं सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये