पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धूतले! गिल-हिटमॅन शर्माची षटकार-चौकारांची बरसात

कोलंबो : (Asia Cup 2023 India Vs Pakistan) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना सुरु झाल्यापासून जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रत्येक सामना संघर्षमय आणि रंगतदार होत असतो. मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात देखील पाऊस पडताना दिसत आहेत मात्र, हा पाऊस भारतीय खेळाडूंच्या बॅटमधून षटकार चौकरांच्या धावांचा पाऊस पडत आहे.
मागील सामन्यात अपयशी ठरलेली रोहित-गिलची जोडी या सामन्यात मात्र, पाकिस्तानी गोलंदाजांची धू-धू धूलाई करताना पाहायला मिळत आहे. भारताने १६ षटकांमध्ये ७.४ च्या सरासराने ११८ धावांचा पाऊस पाडला आहे. शुभमन गिलने १० चौकारांच्या मदतीने ५१ चेंडूत ५८ धावा तर, कर्णधार रोहित शर्माने ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४८ चेंडूत ५६ जोडल्या आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शामी यांना डच्चू देण्यात आलाय.