राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

आयटीतील तरुणाईचा कलाक्षेत्राकडे वाढता कल

आयटीतील तरुण बनले ब्लॉगर्स
सध्या आयटीतील तरुणाई वेळ काढून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवरील व्हिडीओ पाहून कला शिक्षण घेत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे घरी असलेली २२ ते ३५ वयोगटातील तरुणाई तर चक्क फूड, ट्रॅव्हल आणि फिटनेस ब्लॉगिंगकडे वळली आहे. यू-ट्यूबवर अनेकांनी चॅनेल सुरू केले असून, त्या माध्यमातून ते वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करीत आहेत. या फूड, ट्रॅव्हल आणि फिटनेस व्हिडीओला चांगला प्रतिसाद आहे. त्यातून त्यांची आर्थिक कमाईही होत आहे.

पुणे : वर्क फ्रॉम होम’मध्ये अडकलेली आयटीतील तरुणाई आता कला शिक्षणाकडे वळली आहे. नोकरीच्या पलीकडे आपण एखादी कला शिकावी अन् आपल्यातील कलाकारीला वाव मिळावा, यासाठी तरुण-तरुणी कला शिक्षणावर भर देत आहेत.
वीकेंडला सुटीच्या दिवशी विविध भाषा, गायन, नृत्य, वादन, चित्रकला, अभिनय अशा विविध कलांचे शिक्षण घेण्यास तरुणाई प्राधान्य देत आहे.

कोणी ऑनलाइन वर्गाद्वारे तर कोणी प्रत्यक्ष वेळ काढून कलावर्गांना जात असून, अनेकांनी गायन, वादनाचे प्रशिक्षण घेऊन कार्यक्रमांत सादरीकरणही सुरू केले आहे. आयटीतील नोकरदार तरुण-तरुणीही आपल्या व्यग्र दिनक्रमातून कला शिक्षणाकडे वळत असून, गायन-वादनासह नृत्य, चित्रकला, नाट्याभिनय, सुलेखन, लेखन, पाककला आणि भाषा शिक्षणाकडे त्यांचा ओढा वाढला आहे. प्राधान्याने शनिवारी आणि रविवारी ते कला वर्गांमध्ये सहभाग घेत आहेत.

वीकेंडला दोन तास कला वर्ग होत असून, प्रशिक्षक आयटीतील तरुणांसाठी आवर्जून वीकेंडला असे वर्ग घेत आहेत. त्याशिवाय काहीजण लेखनाकडेही वळले आहेत. काहीजण मराठी, हिंदी भाषेच्या लेखनासह मोडी लिपी शिकण्यासाठीही वेळ काढत आहेत. सहा महिने ते एक वर्षाच्या या ऑनलाइन-ऑफलाइन वर्गांसाठी एकूण साधारणपणे १५ ते २० हजार रुपये शुल्क आकारले
जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये