“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून….” बंडखोर आमदारांच्या वक्तव्याचा थर घसरतोय का?

मुंबई : (Rebel Aamdar Shinde Group) शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चांगलाच वाढताना दिसून येत आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या वक्तव्याची पातळी घसरताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी कळमनुरीचे बंडखोर आमदार आधिकाऱ्यांनी मारले. त्यानंतर दुसरे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे जाहीर कार्यक्रमात शिवसैनिकांचे हातपाय तोडायची भाषा करतात.
हे काही की काय धुळ्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते शिवसेनाच्या सुरु कार्यक्रमात गोंधळ घातल आहेत आणि आमदार चुन चुनके, गिन गिनके मारण्याची भाषा करतात. तर आता शिंदेचे मंत्री देखील मारामारीची भाषा करताना दिसून येत आहेत. काल जाहीर कार्यक्रमात शिवसैनिकांना शिंगावर घेण्याची भाषा करतात. ज्या मंत्र्यांवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, तेच असं बोलत असतील तर मग सामान्य नागरीकांनी अपेक्षा कोणावर ठेवायची असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
दरम्यान, आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. “३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवा विषय मिळाला आहे. त्यामुळे बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली की, काय? असा प्रश्न सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. यानंतर तरी मुख्यमंत्री शिंदे या मंत्री आमदारांना आळा घालणार का? देखील पहाण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे.