ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चालू पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिली चिट्ठी!

मुंबई : (Fadnavis gave letter Chief Minister press conference) गुरुवार दि. १४ रोजी शिंदे सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पेट्रोल 5 आणि डिजेल 3 रुपयांनी स्वस्त केलेल्या निर्णयाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अन्य घेतलेल्या निर्णयाची देखील त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना एक चिठ्ठी सरकावली त्यावरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. या चिठ्ठी प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली आहे. चालू असलेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातील पेन काढला. एका चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं आणि हळूच ही चिठ्ठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिली. त्यामुळे त्या चिठ्ठीत नेमकं होतं यावर जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र, या चिठ्ठीत नेमकं काय होत हे समजू शकलं नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये