ताज्या बातम्यारणधुमाळी
ठाकरे सरकारचा दणका; राणा दाम्पत्याची रात्र पोलीस ठाण्यात

मुंबई : नुकतंच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. तसंच उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
राणा दाम्पत्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आज किंवा उद्या न्यायालयात हजर करण्याअगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसंच खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्यने गर्दी केली आहे. याचबरोबर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे देखील समोर आले आहे.