पुण्यातील सारिका पाठक यांचे स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण उत्पादन

प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिकचे उत्पादनांमुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि त्यामुळे निर्माण होणारे विविध प्रश्न हे सध्या एक चटिल समस्या बनली आहे या सर्व प्लास्टिक उत्पादनामध्ये वापरून फेकण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिनमुळे विघटीत न होणारा कचरा आणि त्यामुळे नद्या नाले ड्रेनेजेस तुंबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे.
स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन हे आता गरजेचे झाले आहे. परंतु, या नॅपकिनचे विघटन व्हावे आणि याच्यामुळे होणाऱ्या जैविक- अजैविक कचऱ्यापासून मुक्तता व्हावी हे मोठे आव्हान स्वीकारत एमआयटी टेक्नॉलॉजी बिझनेस इंक्युबेटरमधील विद्यार्थिनी सारिका पाठक कुलकर्णी यांनी सॅनिटरी नॅपकिन चे एक महत्त्वपूर्ण उत्पादन समोर आणले आहे. विघटन होणारे सॅनिटरी नॅपकिन त्यांनी तयार केले असून, हे पॅड वापरल्यानंतर गरम पाण्याच्या वापराने पूर्णपणे नामशेष करता येते.
मासिक पाळीवेळी असलेल्या समस्या लक्षात घेऊन सुरक्षित कॉम्पॅक्ट आणि पर्यावरणास अनुकूल असा सॅनिटरी नॅपकिन्स पर्याय यामुळे जगाला मिळणार आहे. अनेक वर्षांच्या संशोधन आणि विचार मंथन नंतर सारिका यांनी हे क्रांतिकारी उत्पादन विकसित केले आहे. यामध्ये गरम पाण्याने फ्लश केल्यानंतर हे नॅपकिन विघटित होते. विशेष म्हणजे हे नॅपकिन प्लास्टिकमुक्त असून, ते कोणत्याही प्रकारे प्रदूषण निर्माण करणारे नाही .
या उत्पादनामुळे महिलांना पाण्यामध्ये सुरक्षितपणे विरघळणारे बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड मिळणार आहे. तसेच ‘पिरियड केअर’ सोपी होऊन संपूर्ण यंत्रणा अधिकाधिक इको कॉन्सेस बनणार आहे.
ही आहेत उत्पादनाची वैशिष्ट्ये
प्लास्टिक मुक्त आणि प्रदूषण मुक्त उत्पादन
महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्यासाठी उपयुक्त
विघटनासाठी प्रथमच शाश्वत पर्यायबाजारात उपलब्ध असलेल्या इतर पॅड्सप्रमाणेच वापरा.वापरल्यानंतर, कंटेनरमध्ये गरम पाणी ओतल्यानंतर ते लगेच विरघळण्यास सुरवात होते.