ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
अमरावतीत मोठी दुर्घटना; इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

अमरावती : अमरावतीमधील प्रभाग चौकात मोठी दुर्घटना घडली आहे. चौकातील इमारत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तत्काळ दुर्घटना स्थळावर धाव घेतली. माहिती मिळताच खासदार नवनीत राणा घटनास्थळी गेल्या आहेत. इमारत कोसळल्या मागची करणे अजून स्पष्ट झालेली नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी पोहोचलेले आहेत.
कोसळलेली इमारत जुनी झाली होती. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या खालच्या अनेक दुकानात लोक थांबलेले होते. तेवढ्यात इमारत कोसळली. यात आत्तापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, अजून दोन जण ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती आहे.