राष्ट्रवादीनं पाठित खंजीर खुपसला म्हणत; नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे केली तक्रार…

नागपूर : भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीनं आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला. त्यानंतर अजित पवारांनी देखील पटोलेंना उत्तर दिलं. आता हा वाद टोकाला पोहोचला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनी चिंतन शिबिर उदयपूरमध्ये हजेरी लावत काँग्रेस हायकमांड राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.
दरम्यान, भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. पण, राष्ट्रवादी नेहमी भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. त्यानंतर अजित पवारांनी देखील पटोलेंना प्रत्युत्तर दिले होते.