ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुकमाचा एक्का कोण?; मुख्यमंत्री नावाची आज घोषणा- उद्या शपविधी!

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळाले आहे. भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कारण मागील निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. परंतु, यावेळी भाजपने १४९ जागा लढवून १३२जागांवर बाजी मारली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ८१ जागांपैकी ५५ जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला आहे. अशातच मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची चर्चा आहे. पण मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल आणि राज्याचा हुक्कमी एक्का कोण असेल ? हे पाहणे औत्सुकाते ठरणार आहे. राज्यातून मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांची नावांची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. जात असले तरी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची औपचारिक निवड झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीतर्फे दावा केला जाईल. तत्पूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी बुधवारी सकाळी १० वाजता विधान भवनात बैठक होणार आहे.

महायुतीच्या मोठ्या विजयात भाजपची भूमिका महत्त्वाची असल्याचे समोर आले आहे. परंतु, महायुतीला बहुमत मिळवून देण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोलले जातं आहे. कारण एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बंड करून भाजपला पाठिंबा दिल्यानंतरच महायुतीचं सरकार स्थापन झाले. त्यावेळी भाजपने शिंदे गटाला समर्थन देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. दुसरीकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. परंतु, यावेळी निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.

महायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला !

महायुती २.० सरकारचा शपथविधी उद्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागांवरून विजय मिळवल्याने सरकारमध्ये २१ ते २२ मंत्रिपदे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. गृहमंत्रालयावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू असली तरी गृहमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. भाजप गृह विभाग सोडण्य़ास तयार नाही. विधानसभा अध्यक्षपद देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदावर शपथविधीनंतर चर्चा होणार आहे. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाच्य़ा ११ ते १२ आमदारांना तर अजित पवार गटाच्या १० आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभेचा निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्याचामुख्यमंत्री कोण होणार, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.त्यातच भाजपने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वीच पाच डिसेंबरला शपथविधी कार्यक्रमाचे आयोजनकेले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यातमुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये