ताज्या बातम्यामनोरंजन

प्रभुदेवासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आलेली ‘ही’अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

मुंबई | Actress Nayantara – दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आज फिल्ममेकर विग्नेश शिवनशी लग्नबंधनात अडकली आहे. तसंच नयनताराच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. गेल्या ७ वर्षांपासून नयनतारा आणि विग्नेश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अखेर आज ते विवाहबंधनात अडकले आहेत. मात्र विग्नेशच्या आधी नयनताराचं खासगी आयुष्य आणि लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिलं आहे. इंटिमेट फोटो लीक होणं ते अगदी विवाहित असलेल्या प्रभूदेवासोबतचं तिचं गाजलेलं अफेअर या सर्वच गोष्टींमुळे तिचं नाव चर्चेत राहिलं आहे.

नयनतारानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात अभिनेता सिम्बूसोबतचं तिचं नातं फार गाजलं होतं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही काही महिन्यांतच दोघंही वेगळे झाले. तसंच त्यांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यानं दोघंही बरेच चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये दोघेही एमकमेकांना किस करताना दिसत होते. लीक झालेले हे फोटोच या दोघांच्या ब्रेकअपचं कारण असल्याचं बोललं जातं. त्याचबरोबर सिम्बूने पब्लिसिटीसाठी हे फोटो लीक केले होते असा आरोपही झाला होता. अनेक वर्षांनंतर यावर मौन सोडताना सिम्बूने हे फोटो दुबईमध्ये क्लिक करण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्याने नवीन कॅमेरा घेतला होता. मात्र या वादामुळे त्याला बराच मानसिक त्रास झाल्याचंही त्यानं सांगितलं होतं.

सिम्बूनंतर नयनताराच्या आयुष्यात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवाची एंट्री झाली. दोघांनीही ‘विल्लू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तसंच नयनतारा आणि प्रभूदेवा जून २००९ साली लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. २०१० साली प्रभूदेवानं त्याचं नयनतारासोबत अफेअर असल्याचं मान्य करत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढंच नाही तर नयनतारानं तिच्या मनगटावर प्रभूदेवाच्या नावाचा टॅटू देखील बनवून घेतला होता. पण या नात्यातील सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की, त्यावेळी प्रभूदेवा विवाहित होता. पण तरीही त्यानं नयनतारावर प्रेम असल्याचं जाहीर केलं होतं.

https://www.instagram.com/p/CelOevbBmZv/?utm_source=ig_web_copy_link

नयनतारा आणि प्रभूदेवाच्या आयुष्यात सर्वकाही ठीक चाललं होतं पण जेव्हा प्रभूदेवा यांच्या पत्नीनं घटस्फोट देण्यास नकार दिला तेव्हा हे प्रकरण न्यायलयात पोहोचलं. प्रभूदेवाची पत्नी लताने त्याच्यावर विवाहित असताना अफेअर आणि कुटुंबाला आर्थिक पाठबळ न दिल्याचा आरोप केला. यावरून बराच वाद झाला आणि अखेर लता आणि प्रभूदेवा यांचा घटस्फोट झाला. दरम्यानच्या काळात नयनताराने चित्रपटांतून ब्रेक घेतला. पण २०११ साली या दोघांचं लग्न होण्याआधीच ब्रेकअप झालं. याचं कारण प्रभूदेवानं नयनताराला लग्नासाठी कोणतीही कमिटमेंट न देणं हे सांगितलं गेलं. मात्र नयनतारा आणि प्रभूदेवा वेगळे झाल्यानंतर नयनतारा आणि विग्नेश यांनी २०१५ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. एका चित्रपटाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. तसंच मागच्या ७ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये