ताज्या बातम्या

Twitter Down : ट्विटर पुन्हा डाऊन! कुणाचचं ट्विट दिसेना आणि लोडही होईना

Twitter Down : #TwitterDown ट्रेंडीगला आला कारण पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झाले आहे. हे काही नवीन नाही, कारण गेल्या काही महिन्यांत प्लॅटफॉर्मला अनेक वेळा आउटेजचा सामना करावा लागला. ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी अलीकडेच सांगितले की ते, त्यांच्या टीमसह, सध्या ट्विटरवरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत. परंतु आज पुन्हा ट्विटरने वापरकर्त्यांसाठी नाराज केले आहे.

मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्हीवर ट्विटरची समस्या भेडसावत होती. यावेळी कोणतेही फ्रेंड किंवा इतर कुणाचेही ट्विट दाखवत नव्हते, परंतु युजर्स ट्विट पोस्ट करू शकत होते. ट्विट पोस्ट करण्यात कोणतीही अडचण आली नाही आणि ते सुरळीत पार पडले.

अनेक यूजर ‘ट्विटर डाऊन आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. तर अनेकांनी त्यांना येत असलेल्या एररचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विट्स लोड होत नसल्याचे दिसून येत आहे. . ट्विटरच्या वारंवार होणार्‍या जागतिक आउटेजमुळे वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये